Friday, January 21, 2022

 थिएटर अकॅडमीत अनपेक्षितपणे बर्टोल्ट ब्रेख्त शिकवण्याची वेळ आली हा माझ्या आवडत्या नटककारांपैकी एक विशेषतः गॅलिलिओ , मदर करेज अँड हर थ्री चिल्ड्रन व  कॉकेशियन चॉक सर्कल !त्यामुळे ह्यांच्यावर बोललो ह्या निमित्ताने मार्क्सवर थोडे बोललो  ब्रेख्त काहीही बोलला तरी कॅपिटॅलिझमची पोलखोल त्याच्या नाटकात दिसत नाही जसा दावा केला जातो त्याच्यापेक्षा इब्सेनची पिलर्स ऑफ द सोसायटी सारखी नाटके भांडवलशाहीची अधिक खोलात जाऊन चिकित्सा करतात ब्रेख्त त्यापेक्षा एन्लाइटेन्मेण्टचा पुरोगामी प्रोजेक्ट अधिक उत्तम तऱ्हेने व खोलात जाऊन गॅलिलिओ व मदर करेजसारख्या नाटकात उकलतो  मराठीतील प्रसिद्ध नाटककार पु ल देशपांडे ह्यांनी त्याच्या थ्री पेनी ऑपेराचे तीन पैशाचा तमाशा ह्या नावाने रूपांतर केले असले तरी हे नाटक बेगर्स ऑपेराची रिमेक होती आणि त्याचे शोधन व  पुनरसंहितालेखन  त्याच्या एलिझाबेथ ह्या प्रेयसीने केले होते त्याने नाही तरीही त्याने ज्या तऱ्हेने एकट्याने श्रेय घेतले ते मला पटले नाही त्यामुळे त्यावर जास्त बोललो नाही आजच्या पोस्टकम्युनिस्ट काळात  मार्क्सवादावर बोलणे हे काहीसे आऊटडेटेड असले तरी आपल्या इतिहासाचा तो अपरिहार्य भाग असल्याने त्याच्यावर चिकित्सक चर्चा झाली पाहिजे असं मला नेहमीच वाटतं एकाच अकादमीक वर्षात मला आधुनिक शोकांतिका शिकवताना कार्पोरेटीझम व एपिक थिएटर शिकवताना सोशॅलिझम ह्या दोन्ही परस्परविरोधी इझमवर बोलायची संधी प्रथमच मिळाल्याने मजा आली नेहमीप्रमाणे दोन विद्यार्थी अद्ययावत वाचन केलेले होते आणि १५ -१६ जण अजिबात न वाचलेले होते मागील वर्षी पोस्टमॉडर्निझम वाचलेले दोन विद्यार्थी होते जे झडझडून वाद घालणारे होते ह्यावर्षी असा एकही न्हवता 

श्रीधर तिळवे नाईक