Tuesday, December 27, 2022

प्रतिक्रिया

 एखाद्या व्यक्तीने कोणते कपडे किंवा अलंकार घालावेत हा पूर्णपणे तिचा प्रश्न आहे तुम्ही तिला एकांतात सूचना करू शकता पण आज्ञा नाही आणि सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही माझी भिडे ह्यांना नम्र विनंती आहे कि असं काही करण्यापेक्षा त्वचेला घातक अशा भेसळयुक्त कुंकवाची व हळदीची जी उत्पादने चाललेत ती कशी बंद पडतील ह्याकडे त्यांनी लक्ष्य द्यावे म्हणजे कुंकू लावणाऱ्या ज्या स्त्रियांना सद्या त्वचेला त्रास होतो त्यांना दिलासा मिळेल मुख्य म्हणजे कुंकू आणि मंगळसूत्र जानवं आणि टिळा ह्या विषयांवर फोकस करू नका ज्या शिवाजी आणि संभाजी महाराजांना आदर्श मानता त्यांनी कधीही असल्या गोष्टी केलेल्या नाहीत हिंदवी स्वराज्याचा आधार स्वातंत्र्य समता बंधुता हा होता आणि त्यात स्त्रियांना स्वातंत्र्यही येते 

श्रीधर तिळवे नाईक 

विलास सारंगांच्यानंतर समीक्षेच्या चिमटीत न सापडणारा कथाकार म्हणून तांबेंच्या कथांचा विचार करावा लागतो सतीश तांबेची कथा देशीवादापासून सुरु झाली तरी ती देशीवादात सापडली नाही ती नंतर देशीवादाला ओलांडून वास्तवाला वेगळ्या कॉन्फिगरेशनसमध्ये तब्दील करत स्वतःलाच वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आजमावत राहिली सरधोपट पात्रांच्या देशीवादी बक्कळीत त्यांची पात्रे अरबननेसची जाणीव देत लख्ख उभी राहतात कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती ह्यांचा अजिबोगरीब मिलाफ तोही भाषेच्या टोकदारपणासहित अवतरणे हे विलक्षण आहे त्यांच्या नवीन कथासंग्रहात त्यांनी नवं काय केलं ह्याची उत्सुकता ! 

श्रीधर तिळवे नाईक 

तवा फिरवलाय भाकरी नीट तव्यावर परतावी म्हणून श्रीधर तिळवे नाईक 

गांधी घराण्यात जिथे एक लायक मिळत नाहीये 

तिथे पवार घराण्यात मुख्यमंत्रीपदासाठी दोघेही लायक 

हा दुर्मिळ योग

फक्त अजितरावांचा संयम संपत चाललाय 

अन भाजप दारात आमीष घेऊन उभा 

आमिष पत्करले तर दोन वर्षांनी राज ठाकरे होण्याची शक्यता 

किंवा स्वतंत्र नेतृत्व म्हणून उदय 

पवार म्हणतायत आत्ताच हिंमत दाखव 

अन अध्यक्षपद स्वीकारून स्वतंत्र नेतृत्व करता येते कि नाही ते सिद्ध कर 

प्रश्न धाडसाचा आहे 

मूर्ख माणूस सीएम साठी कुठलंही धाडस दाखवतो 

कारण निदान इतिहासात नोंद होतेच 

तेव्हा नुसती नोंद नोंदवायची 

कि पुन्हा वाट पहायची 

हाच खरा सवाल आहे 

अध्यक्षपद स्वीकारून भाजपबरोबर गेले तर निर्णय अजित पवारांचा 

शरद पवारांचा संबंध नाही असा संदेश 

आणि सुप्रियाताईंनी अध्यक्षपद स्वीकारले तर 

राष्ट्रवादीचे नेतृत्व कायमस्वरूपी सुप्रियाताईंच्याकडे 

शेवटी पर्याय एकच 

काका मी भाजपबरोबर जात नाही 

तुम्हीच अध्यक्ष रहा 


शेवट कार्यकर्त्यांच्या अन अजित पवारांच्या विनंतीवरून 

शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला 

किंवा अजित पवार पक्षातून बाहेर 

कायमस्वरूपी दुसरे राज ठाकरे 


मूळ पक्षातून बाहेर पडून जिथं 

शरद पवारांचंच भलं झालं नाही 

तिथं अजित पवारांचं काय भलं होणार ?

तेव्हा दादा ,

अध्यक्षपद मिळत असेल तर घ्या 

शरद पवार अन सुप्रियाताई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चालवणार असं जाहीर करा 

अन हिंमतीने मुख्यमंत्रीपदासाठी वाटाघाटी करता येतील इतक्या जागा जिंकून दाखवा 

============================================


Friday, January 21, 2022

 थिएटर अकॅडमीत अनपेक्षितपणे बर्टोल्ट ब्रेख्त शिकवण्याची वेळ आली हा माझ्या आवडत्या नटककारांपैकी एक विशेषतः गॅलिलिओ , मदर करेज अँड हर थ्री चिल्ड्रन व  कॉकेशियन चॉक सर्कल !त्यामुळे ह्यांच्यावर बोललो ह्या निमित्ताने मार्क्सवर थोडे बोललो  ब्रेख्त काहीही बोलला तरी कॅपिटॅलिझमची पोलखोल त्याच्या नाटकात दिसत नाही जसा दावा केला जातो त्याच्यापेक्षा इब्सेनची पिलर्स ऑफ द सोसायटी सारखी नाटके भांडवलशाहीची अधिक खोलात जाऊन चिकित्सा करतात ब्रेख्त त्यापेक्षा एन्लाइटेन्मेण्टचा पुरोगामी प्रोजेक्ट अधिक उत्तम तऱ्हेने व खोलात जाऊन गॅलिलिओ व मदर करेजसारख्या नाटकात उकलतो  मराठीतील प्रसिद्ध नाटककार पु ल देशपांडे ह्यांनी त्याच्या थ्री पेनी ऑपेराचे तीन पैशाचा तमाशा ह्या नावाने रूपांतर केले असले तरी हे नाटक बेगर्स ऑपेराची रिमेक होती आणि त्याचे शोधन व  पुनरसंहितालेखन  त्याच्या एलिझाबेथ ह्या प्रेयसीने केले होते त्याने नाही तरीही त्याने ज्या तऱ्हेने एकट्याने श्रेय घेतले ते मला पटले नाही त्यामुळे त्यावर जास्त बोललो नाही आजच्या पोस्टकम्युनिस्ट काळात  मार्क्सवादावर बोलणे हे काहीसे आऊटडेटेड असले तरी आपल्या इतिहासाचा तो अपरिहार्य भाग असल्याने त्याच्यावर चिकित्सक चर्चा झाली पाहिजे असं मला नेहमीच वाटतं एकाच अकादमीक वर्षात मला आधुनिक शोकांतिका शिकवताना कार्पोरेटीझम व एपिक थिएटर शिकवताना सोशॅलिझम ह्या दोन्ही परस्परविरोधी इझमवर बोलायची संधी प्रथमच मिळाल्याने मजा आली नेहमीप्रमाणे दोन विद्यार्थी अद्ययावत वाचन केलेले होते आणि १५ -१६ जण अजिबात न वाचलेले होते मागील वर्षी पोस्टमॉडर्निझम वाचलेले दोन विद्यार्थी होते जे झडझडून वाद घालणारे होते ह्यावर्षी असा एकही न्हवता 

श्रीधर तिळवे नाईक